राहुल गांधींच्या त्या वक्तव्याचे पडसाद औरंगाबादेतही, सावरकरांची उडवली होती खिल्ली

Foto


औरंगाबाद- काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विरोधात सोमवारी दुपारी भाजप कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. स्वातंत्र्यवीर वि. दा सावरकर यांच्याबद्दल जगदलपूर ( छत्तीसगड ) येथील सभेत अपशब्द वापरून सावरकरांचा अपमान केला असल्याची भावना भाजप कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. त्यांच्या या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी सोमवारी गुलमंडी पार्किंग परिसरात भाजपचे गुलमंडी मंडळ अध्यक्ष सुधीर नाईक यांच्या नेतृत्वात राहुल गांधी विरोधात घोषणाबाजी करून, निदर्शने करण्यात आली.

 

यावेळी दयारामजी बसैये बंधू, सचिन वाडे पाटील, सिद्धार्थ साळवे, विनय सूर्यवंशी, केदार ठाकरे, अमित घनघाव, शिवाजी इंजे पाटील, विशाल कोहली, गणेश उपाध्ये, कैलास फुसे, धर्मवीर लाहोट, सुनील शरणागत, राहुल घोडके, प्रवीण पंडित, रणधीर होलीये, संदीप राठोड, अभिजित पवार, अक्षय गोटमे, सुधीर चव्हाण, पूनम भोसले, अमित लोखंडे, बाळू मुंडेलिकसागर विसपुते आदी उपस्थित होते.